‘शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा काहीतरी घडतं, दाढीला हलक्यात…’, शिवसेनेच्या नेत्याचं मोठं वक्तव्य
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये शिदें यांनी गृहमंत्रीपदावर दावा केला मात्र भाजपने हा दावा फेटाळून लावलाय. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यानं मोठं वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटून गेला तरी मात्र राज्याला मुख्यमंत्री मिळालेला नाही. तर सत्तास्थापनेचा पेच कायम असताना दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये शिदें यांनी गृहमंत्रीपदावर दावा केला मात्र भाजपने हा दावा फेटाळून लावलाय. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यानं मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दाढीवरून हात फिरवत आहे, तेव्हा तेव्हा राष्ट्रामध्ये मोठ्या काहीतरी घडतं. त्यामुळे ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेऊ नका’, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. यावेळी संजय शिरसाट यांनी असेही म्हटले की, शिंदे दुपारी मुंबईत येणार आणि संध्याकाळी तिघांची बैठक होऊ शकते. तर खात्यासंदर्भात उद्या दुपारपर्यंत शिक्कामोर्तब होऊ शकतो, चांगलं काम व्हावं म्हणून काही खात्यांवर आम्ही दावा केला आहे, अशी माहितीही शिरसाटांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दाढीवरून हात फिरवत आहे, तेव्हा मोठं काहीतरी घडतं. शिंदेंच्या दाढीत ताकद आहे, त्यामुळे ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेता कामा नये. हेच हलक्यात घेण्याचं काम ठाकरेंनी केलं आणि आता त्यांची काय अवस्था आहे. हे महाराष्ट्राने पाहिलंय. त्यामुळे त्यांना कोणी हलक्यात घेता कामा नये, असंही संजय शिरसाट म्हणाले.