राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? संजय शिरसाट यांनी काय केलं सूचक वक्तव्य?

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? संजय शिरसाट यांनी काय केलं सूचक वक्तव्य?

| Updated on: Jun 24, 2024 | 4:55 PM

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची आज किंवा उद्या घोषणा होण्याची अपेक्षा असल्याचे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलं आहे.

लोकसभा निवडणूक संपल्यापासूनच राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार कधी होणार? याच्या चर्चा होताना दिसत आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची आज किंवा उद्या घोषणा होण्याची अपेक्षा असल्याचे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलं आहे. पुढे संजय शिरसाट असेही म्हणाले की, राज्यातील प्रत्येक नेत्याचं एक मत आहे की, राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार हा लवकरात लवकर झाला पाहिजे. मंत्रिमंडळाच्या फॉरम्युल्यावर चर्चा झाली नाही. आज किंवा उद्या याबाबतची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री एकनाथ यांनी याबाबत गुप्तता पाळली आहे, असं संजय शिरसाट म्हणाले. ज्यावेळी अनेक आमदार हे इच्छुक असतात त्यावेळी गुप्तता ही पाळली जाते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ यांनी याबाबत गुप्तता पाळली आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.

Published on: Jun 24, 2024 04:55 PM