Sanjay Shirsat यांच्या ‘त्या’ वक्तव्यानं महायुतीतील नेते नाराज, शिरसाट यांना समज देणार?
VIDEO | देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या 'त्या' वक्तव्यानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 'शिंदेंनी पुढचे पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहावं, तर देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जावं', असं शिरसाट म्हणाले.
मुंबई, ७ ऑक्टोबर २०२३ | एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून महायुतीतील नेते नाराज असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये संजय शिरसाट यांनी केलेल्या फडणवीस यांच्यासंबंधीतील वक्तव्यामुळे समज देण्यात येईल असेही सांगितले जात आहे. तर एकनाथ शिंदे यांनी पुढचे पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहावं, तर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावं, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं होतं. संजय शिरसाट यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना हे देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधित वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले.

तुमची मुलगी द्या.., गावगुंडाकडून शिक्षकाला मारहाण, व्हिडीओ बघून हादराल

'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला

ठाकरे बंधूंची युती अन पवार कुटुंबाचं मनोमिलन? शरद पवार स्पष्टच म्हणाले

सूर्यदेव कोपले! चंद्रपूर ठरला देशातला सर्वात हॉट जिल्हा
