Sanjay Shirsat : जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर कोण राजकीय पोळी भाजतंय? संजय शिरसाट म्हणाले...

Sanjay Shirsat : जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर कोण राजकीय पोळी भाजतंय? संजय शिरसाट म्हणाले…

| Updated on: Oct 25, 2023 | 5:48 PM

VIDEO | गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीवर ठाम आहेत. अशातच त्यांनी राज्य सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेटमदेखील दिला होता. मात्र तो काल संपला. यानंतर पुन्हा मनोज जरांगे पाटील हे जालन्यात उपोषणाला बसले आहेत.

मुंबई, २५ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीवर ठाम आहेत. अशातच त्यांनी सरकारला ४० दिवसांचा दिलेला अल्टिमेटमही संपला आहे. सरकारने कोणताही निर्णय दिला नाही म्हणून ते पुन्हा उपोषणाला बसले आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी यावरून भाष्य केले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे अदृश्य शक्ती नाही. जरांगे पाटील हा प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि तसं त्यांचं आंदोलन सुरू आहे. पण त्यांच्या या आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न काही लोकं काम करताय. मात्र राजकारणातील काही भोंगे आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करताय. या आंदोलनाच्या निमित्ताने आपण काहीतरी टीका करू शकतो, किंवा शांततेत सुरू असलेल्या आंदोलनात आडवं येण्याचा काही जण प्रयत्न करत असल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे.

Published on: Oct 25, 2023 05:46 PM