'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

‘शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण…’, शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

| Updated on: Dec 18, 2024 | 3:59 PM

शरद पवार शांत आहेत, याचा अर्थ वादळ निर्माण होत आहे, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलं. आहे. संजय शिरसाट यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडी राहिली नाही, शरद पवार काय निर्णय घेतील हे हिवाळी अधिवेशनादरम्यान दिसेल, असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी […]

शरद पवार शांत आहेत, याचा अर्थ वादळ निर्माण होत आहे, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलं. आहे. संजय शिरसाट यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडी राहिली नाही, शरद पवार काय निर्णय घेतील हे हिवाळी अधिवेशनादरम्यान दिसेल, असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी काल नाना पटोले यांची भेट न घेता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, यासंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी संजय शिरसाट यांना सवाल केला. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, ‘तो त्यांचा आपापसातला मामला आहे. आता महाविकास आघाडी राहिली कुठे? महाविकास आघाडीने एकमेकांना पाडण्याचं जे काम केलंय. त्याचा परिणाम आताच्या विधानसभा निवडणुकीत जनतेला दिसून आलाय. आता उद्धव ठाकरे ना नाना पटोले यांना भेटणार ना महाविकास आघाडीतील कोणी कोणाला भेटणार? अशातच हिवाळी अधिवेशनात किंवा अधिवेशानानंतर शरद पवार काय निर्णय घेतील हे तेव्हाच कळेल’ असं म्हणत संजय शिरसाट यांनी मविआवर निशाणा साधला पुढे ते असेही म्हणाले, शरद पवार आहेत ते.. सुप्रिया सुळे कुठे बोलताना दिसतात? त्यांचे कोणते तरी प्रवक्ते बोलताना दिसतात याचा अर्थ समजून घ्या जेव्हा पवार शांत असतात याचा अर्थ वादळ निर्णय होतंय, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं असून सूचक वक्तव्य केलं आहे.

Published on: Dec 18, 2024 03:59 PM