एकनाथ शिंदे जाणार? राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार?; संजय शिरसाट यांचं नेमकं उत्तर काय?
निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री बदलले जाणार नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलणार असून नवे मुख्यमंत्री राज्याला मिळणार आहे, अशा चर्चा वारंवार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तर विरोधकांच्या वावड्यांवर शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलणार असून नवे मुख्यमंत्री राज्याला मिळणार आहे, अशा चर्चा वारंवार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे. निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री बदलले जाणार नाहीत, असं स्पष्टपणे म्हणत मुख्यमंत्री बदलणार असल्याच्या वावड्या विरोधक उठवत आहेत, असं शिरसाट म्हणाले. मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चांवर संजय शिरसाट यांनी विरोधकांना स्पष्ट उत्तर दिले आहेत. ‘मुख्यमंत्री कुठेही बदलले जाणार नाही. काही लोकांना वावड्या उठवण्याची सवय असते’, असे म्हणत संजय शिरसाट यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तर आमचे मुख्यमंत्री खंबीर आहेत, मजबूत आहेत. निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री बदलण्याचे कोणतेही पर्याय नाही. एकदम जोरात आणि 24X7 काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बदलला जाणार नाही नाही नाही…. असे ठणकावून विरोधकांच्या वावड्यांवर संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे.