Sanjay Shirsat : ‘काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, त्याची लायकी काय…’, संजय शिरसाट यांचा कोणाला टोला?
प्रत्येक अमवस्या आणि पौर्णिमेला कोणती शेती असते? यानं काही चित्र बदलणार आहे का? असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलं आहे,
एकनाथ शिंदे दोन दिवस आपल्या साताऱ्यातील दरे गावाला गेल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून टीका केल्याचे पाहायला मिळाले. ‘काळजीवाहू मुख्यमंत्री गायब होणं कितपत योग्य आहे?’, असा खोचक सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तर प्रत्येक अमवस्या आणि पौर्णिमेला कोणती शेती असते? यानं काही चित्र बदलणार आहे का? असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलं आहे, ‘काठावर पास झालेल्या मुलानं असं बोलणं योग्य आहे का? मेरीटमध्ये आलेल्या पोरानं बोललं असतं तर ठीके पण या काठावर पास झालेल्या मुलाने बोलणं कितपत योग्य आहे?’, असा टोला शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. तर त्याची लायकी काय ते वरळीच्या लोकांनी दाखवून दिली आहे. नुसतं याला गाडू, त्याला पाडू, असं बकवास बोलून सरकार येत नसतं तर शिकलं पाहिजे, संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेवर पलटवार केलाय.