‘महाविकास आघाडी टिकणार नाही, केवळ धडपड सुरुये’; ‘या’ नेत्यानं केला दावा
VIDEO | गोमूत्राने शुद्धीचे शिंपण करणाऱ्यांपासून हिंदुत्वाला खरा धोका, संजय राऊत यांच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या नेत्याचं प्रत्युत्तर
मुंबई : त्र्यंबकेश्वरातील गोमुत्रधारी हिंदुत्वाचे उपठेकेदार आहेत. खरं तर हिंदुत्वाला खरा धोका त्र्यंबकेश्वराला धूप दाखविणाऱ्यांपासून नसून गोमूत्राने शुद्धीचे शिंपण करणाऱ्यांपासून आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनातील अग्रलेखात केले आहे. यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिरसाट म्हणाले, गोमूत्र शिंपडण्याची भाषा हे करताय, ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर एकनाथ शिंदे आणि अनेक पदाधिकारी गेलेत त्यावेळी गोमूत्र कोणी शिंपडले? असा सवाल करत त्यांनीच दंगली घडवण्याचं काम केलं असल्याचा आरोप केला आहे. यासह कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातही तोच पॅटर्न राबवणार आहे, आणि तशाप्रकारे पाऊलं उचलताना दिसतंय यावर संजय शिरसाट म्हणाले, महाविकास आघाडी टिकणार नाही, त्यांच्यात एकमत नाही, धडपड सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटात सुरू असणारी धडपड केवळ आमदार वाचवण्यासाठी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतील मविआच्या जागावाटपावर भाष्य करताना ते म्हणाले, महाविकास आघाडी होणारच नाही. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. मग राष्ट्रवादी काय करणार, त्यामुळे महाविकास आघाडी होणार नाही, मुळात ही आघाडी टिकणारच नसल्याचा पुनरूच्चार संजय शिरसाट यांनी केले आहे.