Sanjay Shirsat : संजय शिरसाट मंत्री होताच अॅक्शन मोडवर, कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं

Sanjay Shirsat : संजय शिरसाट मंत्री होताच अॅक्शन मोडवर, कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं

| Updated on: Dec 24, 2024 | 4:39 PM

संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरमध्ये असताना त्यांनी एका महिला अधिकाऱ्याला कॅमेऱ्यासमोरच झापले. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांनी आज शासकीय वसतीगृहाला भेट दिली. मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहाला अचानक भेट देत संजय शिरसाट यांनी शासकीय वसतीगृहाची पाहणी केली.

महायुती सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री झालेले शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर संजय शिरसाट हे अॅक्शन मोडमध्ये आले आल्याचे पाहायला मिळत आहेत. संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरमध्ये असताना त्यांनी एका महिला अधिकाऱ्याला कॅमेऱ्यासमोरच झापले. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांनी आज शासकीय वसतीगृहाला भेट दिली. मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहाला अचानक भेट देत संजय शिरसाट यांनी शासकीय वसतीगृहाची पाहणी केली. अचानक संजय शिरसाट यांनी मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहाच्या पाहणी केल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाली. यानंतर संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘जवळपास हजार बेड असलेले वस्तीगृह त्याच्या आज बातम्या जेव्हा प्रसिद्ध झाल्या मी तातडीने इथे भेट दिली. ज्यांच्याकडे हा चार्ज आहे त्या मॅडम दोन चार दिवसापासून सुट्टीवर आहे. मी भेट देणार असल्याचे माहिती असूनही त्या आलेल्या नाही. हॉस्टेलचे जर रूम जर पाहिले तर जनावरासुद्धा तिथे एक दिवस राहील की नाही अशी शंका आहे.’, असे शिरसाट म्हणाले. तर नळाला तोट्या, पाणी नाही खालच्या फ्लोअर पासून सहाव्या मजल्यापर्यंत विद्यार्थी पाणी बकेटमध्ये घेऊन जातायत. सगळ्यांच्या काचा फुटलेल्या आहेत. भिंती गळत आहेत. जसं काय हा कोंडवाडा आहे. अशी अवस्था या सगळ्या हॉस्टेलची दुर्दैव असल्याचे शिरसाट म्हणाले.

Published on: Dec 24, 2024 04:39 PM