‘संजय राऊत राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेला कुत्रा अन्…’, कुणी केला हल्लाबोल?
VIDEO | 'संजय राऊत महागद्दार अन् त्यांनीच शिवसेना संपवली', शिवसेनेच्या आमदाराचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल
मुंबई : आनंदाचा शिधा हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला नाही तर तो खोक्यातून शिंदे गटाच्या ४० आमदारांना पोहोचला आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार यांनी केली आहे. या टीकेला शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत ज्या आमदारांना खोके खोके म्हणून बोलताय त्याच आमदारांच्या जीवावर हा खासदार झालाय. या संजय राऊत याने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, आणि पुन्हा निवडणूक लढवून दाखवावं, हे महागद्दार असून त्यानं शिवसेना संपवली आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेला हा कुत्रा, अशा शब्दात संतोष बांगर यांनी संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्राची जनता सर्व पाहत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे विरोधकांच्या कोणत्याही टीकेला उत्तर द्यावं मला वाटत नसल्याचेही संतोष बांगर यांनी म्हटले आहे.
Published on: Mar 21, 2023 03:20 PM
Latest Videos