आम्ही आधी शिवसैनिक, मग मंत्री, राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात – शंभूराज देसाई

| Updated on: Jul 30, 2021 | 7:44 PM

जर पक्षाने सांगितले तर जशास तसे उत्तर देवू. आम्ही आधी शिवसैनिक आहोत आणि नंतर मंत्री त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक शब्द वापरावेत असा इशारा देसाई यांनी दिला आहे.

मुंबई : केंद्रिय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री उद्वध ठाकरे यांच्यावर जी एकेरी भाषेत टीका करत आहेत त्याला जसेच्या तसे उत्तर देण्याची आणि नारायण राणे यांचे तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकामध्ये असल्याचा इशारा गृहराज्मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. पक्षाने सांगितले आहे म्हणून आम्ही शांत आहोत. जर पक्षाने सांगितले तर जशास तसे उत्तर देवू. आम्ही आधी शिवसैनिक आहोत आणि नंतर मंत्री त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक शब्द वापरावेत असा इशारा देसाई यांनी दिला आहे.