ठरलं… बारामतीतून विजय शिवतारे लोकसभा लढणार, म्हणाले; १२ तारखेला १२ वाजता…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन वेळा झालेल्या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. बारामतीमध्ये अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी जाहीर करत बारामती लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याची सांगितली तारीख
बारामती लोकसभा मतदार संघाबाबत शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी भूमिका जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन वेळा झालेल्या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. बारामतीमध्ये अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी जाहीर करत विजय शिवतारे हे येत्या १२ तारखेला बारामती लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर विजय शिवतारे हे बारामतीतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. यावेळी विजय शिवतारे यांनी अजित पवारांसह शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राष्ट्रवादीने महाराष्ट्रात ग्रामीण दहशतवाद पोसला. ग्रामीण दहशतवादाचा उगम हा शरद पवारांमुळे झाल्याचा गंभीर आरोपही शिवतारे यांनी केला. हाच ग्रामीण दहशतवाद अजित पवार यांनी कायम ठेवल्याचे शिवतारे म्हणाले.
Published on: Mar 24, 2024 04:11 PM
Latest Videos