'हा विंचू आधी आम्हाला डसला, आता महादेवाच्या पिंडीवर...', शिवतारेंचा कोणत्या पवारांवर हल्लाबोल?

‘हा विंचू आधी आम्हाला डसला, आता महादेवाच्या पिंडीवर…’, शिवतारेंचा कोणत्या पवारांवर हल्लाबोल?

| Updated on: Mar 24, 2024 | 5:21 PM

2014 सालीच मी खासदार झालो असतो. पण तेव्हा यश आले नाही. मी सगळ्या नेत्यांना हात जोडून मी सांगतोय की ही लढाई मला लढू द्या. एका राक्षसाला संपविण्यासाठी दुसरा राक्षस नको उभा राहायला. हा विंचू आधी आम्हाला डसला आणि आता...

आमदार विजय शिवतारे यांनी आज सर्व सहा विधानसभा मतदार संघातील नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 2014 सालीच मी खासदार झालो असतो. पण तेव्हा यश आले नाही. मी सगळ्या नेत्यांना हात जोडून मी सांगतोय की ही लढाई मला लढू द्या. एका राक्षसाला संपविण्यासाठी दुसरा राक्षस नको उभा राहायला. हा विंचू आधी आम्हाला डसला आणि आता महादेवच्या (नरेंद्र मोदीच्या) पिंडीवर जाऊन बसला आहे अशी टीकाही विजय शिवतारे यांनी केली आहे. शरद पवार यांनी दहशतीचा उगम केला. राष्ट्रवादीने संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रात दहशतवाद पेरला असल्याचा हल्लाबोलही शिवतारे यांनी केला. जनतेचे छुपे आशीर्वाद मला आहेत. ही निवडणूक मी लढणारच. अनेक लोक माझ्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीचे लोक देखील मला पाठींबा देत आहेत. अजित पवार याचं राजकारण स्वार्थाचं आहे. म्हणून आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याचे विजय शिवतारे यांनी सांगितले.

Published on: Mar 24, 2024 05:20 PM