‘कितीही ताकद लावा, आमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाहीत’, राऊतांचं थेट आव्हान
आज सकाळपासून शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित लोकांवर आयकर विभागाचं धाडसत्र सुरु आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपला थेट आव्हान दिलंय. तुम्ही कितीही ताकद लावा, कितीही बदनामी करा, पण तुम्ही आमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाहीत, अशा शब्दात राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवलाय.
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर (Central Investigation Agency) जोरदार हल्ला चढवलाय. आज सकाळपासून शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित लोकांवर आयकर विभागाचं धाडसत्र सुरु आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपला थेट आव्हान दिलंय. तुम्ही कितीही ताकद लावा, कितीही बदनामी करा, पण तुम्ही आमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाहीत, अशा शब्दात राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवलाय. संजय राऊत यांनी ईडी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलाय. ईडीचे मोठे अधिकारी भाजपचं तिकीट घेऊन निवडणूक लढवत आहेत. ज्या ईडी अधिकाऱ्यानं निवडणूक लढवली त्यानं पन्नास जणांचा खर्चही केलाय. ईडी भाजपची एटीएम मशीन बनली आहे. मी अतिशय जबाबदारीनं हे वक्तव्य करतोय. एक्स्टॉर्शनच्या बाबतीतला सगळा कच्चाचिठ्ठा पंतप्रधान कार्यालयाला दिला आहे. तुम्ही स्वच्छ भारत अभियान हे काही फक्त कचरा साफ करण्यासाठी नाही. तर भ्रष्टाचारही साफ करायला हवा, असा टोलाही राऊतांनी भाजपला लगावलाय.