भाजपामुळे शिवसेनेचे खच्चीकरण - नवाब मलिक

भाजपामुळे शिवसेनेचे खच्चीकरण – नवाब मलिक

| Updated on: Jan 24, 2022 | 10:31 PM

राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे.  युतीमध्ये शिवसेनेचे खच्चीकरण  झाल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. 

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे.  युतीमध्ये शिवसेनेचे खच्चीकरण  झाल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. 2019 च्या आधीपासून भाजपसोबत खच्चीकरण होतेय ही चर्चा सुरू होती. भाजप ज्या पक्षांसोबत युती करतो त्यांचे खच्चीकरण करतो हे सेनेला अगोदरच कळले होते. त्यामुळे शिवसेनेने भूमिका घेऊन भाजपला बाजूला केले. सेनेसोबत असताना भाजप मोठी झाली हे आता देवेंद्र फडणवीस यांना समजले आहे. परंतु आठ वर्षापासून फडणवीस सेनेला संपवण्याचे राजकारण करत होते, असा घणाघात मलिक यांनी केला आहे.