बारसू रिफायनरीच्या आंदोलनावर दीपक केसरकराचं भाष्य; म्हणाले, ‘…तर विरोध कमी होईल’
VIDEO | रत्नागिरीतील बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात कालपासून आंदोलन सुरू, शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मुंबई : बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात कालपासून आंदोलन सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज सकाळी साडे आठ वाजेच्या सुमाराला पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तिथे करण्यात आला. तर आंदोलनातील महिला आक्रमक होत पोलिसांच्या गाड्या अडवल्या. यासर्व प्रकरणावर शिवेसनेचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी भाष्य केले आहे. रिफायनरी विषयी अगोदरच्या सरकारने लोकांपर्यंत माहिती पोहचवणं गरजेचं होतं, आता आम्ही योग्य माहिती पोहचवत आहोत. लोकं आंदोलन करतायत हे चुकीचं आहे. ज्या प्रकारे आंदोलन सुरूये हा आंदोलनाचा मार्ग नाही योग्य नाही. शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही याची काळजी घेतोय. हा पूर्ण ग्रीनरी प्रकल्प आहे त्यामुळे सर्वांना फायदा होईल. माझ्या खात्याच्या अंडर हा प्रकल्प येत नाही त्यामुळे मी जास्त बोलणं योग्य नाही. पण या प्रकल्प संदर्भात माहिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे, असेही दीपक केसरकर म्हणाले. विरोध करणाऱ्या या लोकांना विश्वासात घेण्याची गरज आहे. योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहोचली तर विरोध कमी होईल. विकास होत असताना विरोध करणे ही प्रवृत्ती बंद केली पाहिजे तर लोकांपर्यंत माहिती पोहचवली जाईल, असेही ते म्हणाले.