गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या कारचा कट अन् प्रकरण थेट जाळपोळीपर्यंत, जळगावच्या पाळदी गावात 2 गटात राडा
३१ डिसेंबरला गुलाबराव पाटील यांच्या पत्नी कारमधून जात असताना ड्रायव्हरने हॉर्न वाजवला. पण हॉर्न वाजवूनही काही तरूण बाजूला न झाल्याने चालकाने गाडीतून उतरून बाजूला सांगितले. मात्र तरूणांनी चालकालाच शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली.
शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नीच्या गाडीचा धक्का लागल्याने वाद निर्माण झाला. यानंतर दोन गट आमने-सामने आलेत इतकंच नाहीतर जाळपोळ आणि तोडफोड देखील कऱण्यात आली. जळगाव जिल्ह्याच्या पाळदी गावात असं नेमकं काय घडलं की प्रकरण थेट जाळपोळीपर्यंत पोहोचलं? सध्या गुलाबराव पाटील यांच्या पाळदी गावात संचारबंदी आहे. वादाची ठिणगी ही गुलाबराव पाटील यांच्या पत्नीच्या गाडीचा धक्का लागल्याने पडली. ३१ डिसेंबरला गुलाबराव पाटील यांच्या पत्नी कारमधून जात असताना ड्रायव्हरने हॉर्न वाजवला. पण हॉर्न वाजवूनही काही तरूण बाजूला न झाल्याने चालकाने गाडीतून उतरून बाजूला सांगितले. मात्र तरूणांनी चालकालाच शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर गुलाबराव पाटील यांच्या पत्नी कारमधून उतरल्या पण त्यांनाही शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. याच वादातून दोन गट आमने-सामने आलेत यादरम्यान, पाळदी गावात काही वाहनांची जाळपोळ तर मोठी तोडफोन करण्यात आली. काही दुकांनाना आग लावण्यात आली. तर या प्रकरणानंतर गावात शांतता रहावी यासाठी गावात संचारबंदी लागू करण्यात आली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट