‘काही दिवसांत अजितदादा आमच्याकडे येतायत, त्यानंतर…’; शिवसेनेच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
VIDEO | अजित पवार यांच्या प्रवेशावर शिवसेनेच्या मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, तर 'मविआ सरकार पाडण्यासाठी किती बैठका झाल्या हेही सांगू'
जळगाव : एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक मोठा राजकीय गौप्यस्फोट केलाय. काही दिवसानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आमच्याकडे येत आहेत. अजित दादा आमच्याकडे आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी किती बैठका झाल्या हे सांगू असं गुलाबराव पाटील म्हणालेत. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी बैठका झाल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मुंबईत काल पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत अजित पवार यांनीही याच मुद्द्यावर मत मांडलं होतं. याच विषयासंदर्भात गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी काही दिवसानंतर अजित पवार आमच्याकडे येत आहेत, असा मोठा दावा करत अजितदादा आमच्याकडे आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी किती बैठका झाल्या हे सांगू, असं मोठं विधान केलंय.