Shambhuraj Desai : ‘…म्हणून आम्ही शांत, कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर’, शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा थेट इशारा
'कामराने आधी शिंदेंची बदनामी केली. त्यानंतर सीतारामन यांची बदनामी केली. तसेच पंतप्रधान मोदींबद्दल चुकीचे शब्द वापरले. सुप्रीम कोर्टावर चुकीचे विधानही केले. आता वेळ आली आहे की आम्ही शिवसैनिकांनी त्याला शिवसेनेच्या भाषेत उत्तर द्यायला हवे' - शंभूराज देसाई
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत केलं होतं. त्यानंतर राज्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर शिंदेंवरील विडंबन गीताप्रकरणी शिवसेना नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी कुणाल कामराला थेट इशारा दिला आहे. ‘कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्रीचा वापर करावा लागेल. आम्ही मंत्री जरी असलो तरी आधी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे शिवसैनिक आहोत.’, असं म्हणत शंभूराज देसाई यांनी एकप्रकारे इशारच दिला आहे. पुढे ते असेही म्हणाले. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी कुणाल कामरा प्रकऱणात संयम बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. म्हणून आम्ही शांत आहोत. पण जर शिवसैनिक म्हणून आम्ही रस्त्यावर आलो तर कामरा हा कुठेही लपला असला तरी त्याला फरफटत आणून आपटायची ताकद आमच्यात आहे, असं शंभूराज देसाई म्हणाले.

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?

अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू

गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर

तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
