Uday Samant : '...तर एकनाथ शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य

Uday Samant : ‘…तर एकनाथ शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात’, उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Dec 17, 2024 | 1:05 PM

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद न मिळाल्याने अनेक नेते नाराज असल्याचे समोर येतंय. या नाराजीवर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. काय म्हणाले उदय सामंत?

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद न मिळाल्याने अनेक नेते नाराज असल्याचे समोर येतंय. या नाराजीवर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. ‘एखाद्याला मंत्रिपद मिळालं नाहीतर नाराजी होऊ शकते. शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखील कुटूंब म्हणून काम करतो. तानाजी सावंत, विजय शिवतारे हे आम्हाला ज्येष्ठ आहेत ते मंत्री होते. त्यांच्याशी बोलून मुख्यमंत्री त्यांची समजूत काढतील. बाकीचे आमदारही मंत्रिपदासाठी पात्र आहेत. परंतू मंत्रिपदासाठी निवड करताना नेत्याचा कस लागतो. पण मी चांगलं काम केलं नाहीतर एकनाथ शिंदे माझे मंत्रिपद काढून घेऊ शकतात’, असं उदय सामंत म्हणाले. तर छगन भुजबळांची यंदा मंत्रिपदी वर्णी न लागल्याने त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. यावर उदय सामंत म्हणाले, ‘छगन भुजबळ हे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आहेत. त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही हा पक्षांतर्गत विषय आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्यासंदर्भात मी काही वक्तव्य करणं हे शिवसेना कार्यकर्ता म्हणून योग्य नाही. त्यांच्या बाबतीतील योग्य निर्णय अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते घेतील. आमची महायुती असली तरी एखाद्या पक्षातील नेत्याला मंत्रिपद मिळालं नसलं तर त्यावर बोलण्याचा अधिकार मला नाही’. छगन भुजबळांना मंत्रिपद मिळालं नसल्याच्या प्रश्नावर बोलताना उदय सामंत यांनी असं वक्तव्य केलं.

Published on: Dec 17, 2024 01:05 PM