Ashish Jaiswal | बाहरेच्यांना मंत्रिपद मिळतं, 30 वर्ष सेनेत पण सन्मान नाही मिळाला, फार दु:ख होतं
बाहरेच्यांना मंत्रिपद मिळतं, 30 वर्ष सेनेत पण सन्मान नाही मिळाला, फार दु:ख होतं, असं आमदार आशिष जैस्वाल यांनी म्हटलंय. Shiv Sena MLA Ashish Jaiswal Disappoint Shivsena
शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे (Ashok Shinde) यांनी काल राजीनामा दिल्यानंतर, आता विदर्भातील सेनेचा आणखी एक मोठा नेता आणि चार टर्मचे आमदार आशिष जैसवाल (Shiv Sena MLA Ashish Jaiswal) पक्षावर नाराज असल्याची माहिती आहे. त्यामुळे विदर्भात आधीच चौथ्या नंबरवर असलेल्या शिवसेनेला आता मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. आशिष जैसवाल हे नागपूरमधील रामटेक (Ramtek) या मतदारसंघाचे आमदार आहेत.
“30 वर्षे शिवसेनेत काम केलंय पण सन्मान नाही, बाहेरच्यांना मंत्रिपदं मिळतात, पण प्रामाणिक शिवसैनिकांना न्याय नाही. त्यामुळे मनात दुःख आहे, वेदना आहेत” असं म्हणत आ. आशिष जैसवाल यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
Latest Videos

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?

देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र

'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
