शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात ठाकरे गटाची रणनिती काय? जाणून घ्या सविस्तर

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात ठाकरे गटाची रणनिती काय? जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Sep 13, 2023 | 4:36 PM

VIDEO | आमदार अपात्रतेसंदर्भात उद्या शिवसेनेच्या आमदारांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर होणार प्रत्यक्ष सुनावणी, कशी ठरली उद्धव ठाकरे गटाची रणनिती, बघा सविस्तर व्हिडीओ

मुंबई, १३ सप्टेंबर २०२३ | शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान, आमदार अपात्र प्रकरणात ठाकरे गटाची रणनिती ठरवण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या सर्व आमदारांकडून अध्यक्षांकडे वकीलपत्र सादर करण्यात आलं असून त्यामार्फत विधानसभा अध्यक्षांकडे दोन पानी लेखी म्हणणं सादर करण्यात आलंय. सर्व आमदारांच्या उत्तरात एकमत रहावं यासाठी वकिलांमार्फत उत्तर पाठवण्यात आलंय. तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांकडून वकिलपत्रातून लेखी म्हणणं सादर करण्यात आलंय. प्रत्यक्ष सुनावणीवेळी ज्येष्ठ वकील देवदत्त कामत आणि असीम सरोदे हे सर्व आमदारांची बाजू मांडणार आहेत. यापूर्वी विधानभवनात उद्या सकाळी ११ वाजता ठाकरे गटाची बैठक असून सुनावणी आधी सर्व ठाकरे गटातील आमदार एकत्रित चर्चा करणार आहेत. अंबादास दानवे यांच्या दालनात होणाऱ्या बैठकीला वरिष्ठ नेतेही उपस्थित असणार आहे.

Published on: Sep 13, 2023 04:31 PM