शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावरुन सुप्रीम कोर्टाचा संताप, राहुल नार्वेकर यांना थेट दिले आदेश
tv9 marathi Special Report | सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात संताप व्यक्त केला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन विधानसभा अध्यक्षांकडून झालं नाही म्हणत काय दिले सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आदेश?
मुंबई, १४ ऑक्टोबर २०२३ | शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावरुन सुप्रीम कोर्टानं संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. विधानसभेच्या अध्यक्षांकडून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन व्हायला हवं. आता मंगळवारपर्यंत सुनावणीसंदर्भात वेळापत्रक सादर करा. नाही तर आम्ही आदेश देऊ, असा इशारा सरन्यायाधीशांनी विधानसभेच्या अध्यक्षांना दिला आहे. शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात, सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर संताप व्यक्त केला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन झालं नाही. आता मंगळवारपर्यंत निकालासंदर्भात वेळापत्रक सादर करा, असे कडक आदेश सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आता राहुल नार्वेकरांना निश्चित कालावधी सांगावा लागेल. त्यानुसार त्या निर्धारित वेळेत अपात्रतेवर निकाल द्यावा लागेल. सत्तासंघर्षावर निकाल देताना, सुप्रीम कोर्टानं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहेत.