आम्ही रक्त पिणारे ढेकूण नाही तर..., उद्धव ठाकरे यांच्या 'त्या' टीकेला गुलाबराब पाटील यांचे प्रत्युत्तर

आम्ही रक्त पिणारे ढेकूण नाही तर…, उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ टीकेला गुलाबराब पाटील यांचे प्रत्युत्तर

| Updated on: Mar 06, 2023 | 5:04 PM

VIDEO | रत्नागिरीतील सभेत उद्धव ठाकरे यांच्या आरोपांवर गुलाबराब पाटील यांचं उत्तर, बघा व्हिडीओ

जळगाव : रत्नागिरी येथील खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली. मात्र अद्याप याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरू आहे. रत्नागिरीतील सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते, गे ढेकून चिरडायला गोळीबाराची गरज नाही. तुमचे एक बोट मतदानाच्या दिवशी यांना संपवेल, अशी टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार गुलाबराब पाटील म्हणाले, आम्ही रक्त पिणारे ढेकूण नाही, तर रक्त देणारे ढेकूण आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर नाही, तर हिमंत असेल तर तुमच्या बापाचं नाव वापरा आणि मतं मागवून दाखवा, असे उद्धव ठाकरे बऱ्याचदा म्हणाले होते. याला एवढं महत्त्व देणं चुकीचं होईल, शेवटी महापुरूषांचे फोटो, नाव वापरणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. ती त्यांची संपत्ती नाही, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

Published on: Mar 06, 2023 04:52 PM