'संजय राऊत यांच्या तोंडाला XXX झालाय की काय?', शिवसेना नेत्यानं केला हल्लाबोल

‘संजय राऊत यांच्या तोंडाला XXX झालाय की काय?’, शिवसेना नेत्यानं केला हल्लाबोल

| Updated on: Sep 12, 2023 | 2:50 PM

VIDEO | शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी संजय राऊत यांच्यासह विरोधकांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी जळगावातील सभेत केलेल्या टीकेवर शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

जळगाव, १२ सप्टेंबर २०२३ | जळगाव येथील पाचोऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे. यापूर्वी शिवसेना आमदार किशोर पाटील यांचा विरोधकांवर निशाणा साधला आहे. विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरे कुठले काम राहिले नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे 14 आणि शरद पवारांकडे 5 आमदार राहिले आहेत. सर्वच्या सर्व आमदार युती सरकारकडे आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल, असे चित्र सध्या बघायला मिळत आहे. त्यामुळे त्यांना झोप लागत नाही आणि सकाळी उठले की टीका करण्याशिवाय त्यांना काम नाही, असे म्हणत आमदार किशोर पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

तर उद्धव ठाकरे यांनी जळगावातील सभेत केलेल्या टीकेवरही किशोर पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘संजय राऊत यांच्या तोंडाला एड्स झालाय. अशी अवस्था सध्या बघायला मिळत आहे. रोज सकाळी उठले की काहीही अर्वाच्य बोलतात कोणती संस्कृती नाही. संजय राऊत आमच्या जीवावर खासदार झाले आहे. हे उपकार विसरून ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करता ही जनता त्यांना माफ करणार नाही. भविष्यात संजय राऊत खासदार म्हणून दिसणार नाही’, असेही त्यांनी स्पष्ट म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केलाय.

Published on: Sep 12, 2023 02:41 PM