राष्ट्रवादीचा वजीर 40 आमदारांना घेऊन जाणार होता पण…; ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
VIDEO | 'अख्खा राष्ट्रवादी पक्षच नामशेष होण्याच्या मार्गावर', या नेत्यानं केली सडकून टीका
सातारा : साताऱ्यातील कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ही टीका करताना ते म्हणाले, शरद पवार हुशार आहेत म्हणून अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. नाहीतर अख्खा राष्ट्रवादी पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर होता, असे म्हणत आमदार महेश शिंदे यांनी जोरदार निशाणा साधला. राष्ट्रवादीचा वजीर असा अजित पवार यांचा उल्लेख करत पुढे ते म्हणाले, अजित पवार हे ४० आमदारांना घेऊन बाहेर पडले असते, मात्र शरद पवार यांनी किती ही प्रयत्न केले तरी अजित पवार हे त्यांच्या सोबत राहणार नाहीत, असा गौप्यस्फोट आमदार महेश शिंदे यांनी केलाय तर महाविकास आघाडीची वज्रमूठ कधी नव्हतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीची वज्रमूठ कधी गायब केली असल्याची टीका सुद्धा त्यांनी केलीये.