शीतल म्हात्रे पाठलाग प्रकरणी सदा सरवणकर यांनी व्यक्त केला विश्वास, म्हणाले...

शीतल म्हात्रे पाठलाग प्रकरणी सदा सरवणकर यांनी व्यक्त केला विश्वास, म्हणाले…

| Updated on: Mar 14, 2023 | 11:37 PM

VIDEO | 'जी महिला अशा प्रकरणाला विरोध करतेय, तिची वाचा बंद करावी या हेतूने दोघांचा पाठलाग', सदा सरवणकर नेमकं काय म्हणाले...

मुंबई : शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे या त्यांच्या व्हायरल व्हिडीओवरून चांगल्याच चर्चेत आहेत. याप्रकरणी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसताय. गेल्या तीन दिवसांपासून महिलेला बदनाम करण्यासाठी खालच्या पातळीवर जाऊन टीका सुरूये हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहेत. मात्र इतक्यावरच हे थांबलं नसून जी महिला अशा प्रकरणाला विरोध करतेय, तिची वाचा बंद करावी या हेतूने दोन जणांनी शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांचा पाठलाग केला. या दोघांनी शीतल म्हात्रे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, याप्रकरणी खबरदारीचा उपाय म्हणून शीतल म्हात्रे यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आणि यावेळी त्यांचा जबाबही नोंदवण्यात आला. याप्रकरणी पोलीस गांभीर्याने लक्ष घालून योग्य ती कारवाई करतील, असा विश्वासही शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी व्यक्त केला आहे.

Published on: Mar 14, 2023 11:18 PM