Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde यांचा नक्षलवाद्यांच्या हस्ते एन्काऊंटर करण्याचा प्लान होता, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Eknath Shinde यांचा नक्षलवाद्यांच्या हस्ते एन्काऊंटर करण्याचा प्लान होता, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Oct 11, 2023 | 3:50 PM

VIDEO | एकनाथ शिंदे गडचिरोली पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांकडून धमकी. शिंदे यांना झेडप्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मातोश्रीवरून फोन आला शिंदे यांना सुरक्षा देऊ नका. याचा अर्थ काय आहे? तुम्ही त्यांना मारण्यासाठी टपलेले होते असंच ना? शिंदे गटातील नेत्याचा सवाल

मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नक्षलवाद्यांच्या हातून एन्काऊंटर करण्याचा डाव होता, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. तर संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांबाबत वक्तव्य करून मोठा गौप्यस्फोट केला आहे. संजय गायकवाड यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्याचा हत्येचा कट रचण्यात आला होता, असे म्हणत संजय गायकवाड यांनी ठाकरे सरकारच्या मुख्यमंत्र्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. गायकवाड यांनी म्हणाले एकनाथ शिंदे यांना दुसरं काही देणार नव्हते त्यांना मौत देणार होते. नक्षलवाद्यांच्या हातून त्यांचा एन्काऊंटर करणार होते. म्हणून त्यांचं संरक्षण काढलं होतं. मी जबाबदारीने हा मोठा गौप्यस्फोट करत असल्याचा दावा संजय गायकवाड यांनी केला आहे. एकनाथ शिंदे गडचिरोली पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती. त्यावेळी शिंदे यांना झेडप्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मातोश्रीवरून फोन आला. त्यांना सुरक्षा देऊ नका. याचा अर्थ काय आहे? तुम्ही त्यांना मारण्यासाठी टपलेले होते असंच ना? असा सवाही त्यांनी केला.

Published on: Oct 11, 2023 03:50 PM