संजय राऊत यांच्या 'त्या' आरोपांवर संजय गाडकवाड स्पष्टच म्हणाले, 'एकनाथ शिंदे यांच्या सारखा माणूस...'

संजय राऊत यांच्या ‘त्या’ आरोपांवर संजय गाडकवाड स्पष्टच म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांच्या सारखा माणूस…’

| Updated on: Apr 23, 2023 | 11:00 AM

VIDEO | अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्यावर संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया, काय म्हणाले बघा...

बुलढाणा : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाल्यात. दरम्यान, यावर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, अजित पवार यांच्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे, पण 145 चा आकडा आणणार कुठून? नजीकच्या काळात ते 145 चा आकडा जमवू शकतील, असे वाटत नसल्याचे मत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केले. तर अनेक जण लायकी नसताना मुख्यमंत्री झाले असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. यावर संजय गायकवाड म्हणाले, संजय राऊत यांना कदाचित घरात बसून सरकार चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांबाबत बोलायचं असेल. त्यांच्या अनुभवावरून ते बोलत असावे.. एकनाथ शिंदे यांच्या सारखा माणूस 75 वर्षात मुख्यमंत्री झाला नाही आणि होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.