‘म्हणून आम्हीच खरी शिवसेना’, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय गायकवाड यांचं भाष्य
VIDEO | खरी शिवसेना नेमकी कुणाची हे पटवून देताना संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर साधला निशाणा
मुंबई : धनुष्यबाण चोरून नेलं असलं तरी श्रीरामांचा आशीर्वाद अजूनही माझ्यासोबत आहे. आपल्याकडे जरी धनुष्यबाण नसला तरी आपल्याकडे ब्रह्मास्त्र आहे, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. यावर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्र सोडले आहे. प्रभू रामचंद्र हे धनुष्यबाणाशिवाय अपूर्ण आहेत. ज्या दिवशी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत गेलात तेव्हाच तुमच्यात राम शिल्लक राहिला नाही, असे म्हणत संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रभू रामाचं धनुष्यबाण हे आता आमच्याकडे आहे त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहे. ज्यांनी राम मंदिराला वर्षानुवर्षी विरोध केला. आयोध्या राम मंदिर होऊ दिलं नाही त्यांच्यासोबत तुम्ही संगत केली. त्यामुळे हे धनूष्यबाण तुमच्याकडून दूर गेले आणि आता ते पुन्हा कधीही येऊ शकणार नाही, असे म्हणत संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.