अजित पवार राष्ट्रवादी सोडून आले तर…, शिवसेनेच्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं
VIDEO | अजित पवार नॉट रिचबेल झाले तेव्हा काही ना काही घडतं, शिवसेनेच्या नेत्याचा सूचक संकेत, म्हणाले...
मुंबई : गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे काही वेळा नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. यावर शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘अजित पवार पहिल्यांदा नॉट रिचेबल झाले नाहीत. अजित पवार नॉट रिचबेल झाले तेव्हा काही ना काही घडतं. म्हणून कोणती तरी घटना घडणं निश्चित आहे आणि ते संकेत आहे.’ तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर देखील भाष्य केले आहे. शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत कोणाला राहिचे नाहीये. त्यांचे तेच तेच भाषणं ऐकणे, लोकांची कामं न करणे, सारखे टोमणे ऐकणे यामुळे त्या नेत्यांची प्रतिमा खराब होत चालली आहे, त्यामुळे आता त्यांच्याकडे तिथून बाहेर पडण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे संजय शिरसाट यांनी स्पष्ट म्हटले आहे.
Published on: Apr 18, 2023 06:23 AM
Latest Videos