अन् जेव्हा मी तालिका अध्यक्ष असेल तेव्हा भास्कर जाधव यांना..., काय म्हणाले संजय शिससाट

अन् जेव्हा मी तालिका अध्यक्ष असेल तेव्हा भास्कर जाधव यांना…, काय म्हणाले संजय शिससाट

| Updated on: Mar 21, 2023 | 9:49 PM

VIDEO | 'भास्कर जाधव यांची मी समजूत काढेन आणि त्यांना बोलायला जास्त वेळ देईन', काय म्हणाले संजय शिरसाट...?

मुंबई : ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नतमस्क झाल्याचे पाहायला मिळाले. विधानसभेमध्ये बोलू दिले जात नाही, यासह पुढच्या काळात सभागृहात बसण्याची इच्छा नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. ‘भास्कर जाधव हे ज्येष्ठ सदस्य असून गेली २५ वर्ष ते विधिमंडळाच्या सभागृहात येत असतात. त्यामुळे आज त्यांनी जे केलं त्याबद्दल त्यांच्याकडून अशी अपेक्षा नाही’, असे म्हणत संजय शिरसाट यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, भास्कर जाधव असा आरोप करतात की, त्यांना सभागृहात बोलू दिलं जात नाही. आणि हे ते ऐकून घेतली, याचं नवल वाटतं. अनेक सदस्य एकावेळी बोलत असताना भास्कर जाधव यांनी बोलण्याची संधी मिळाली नसेल तर त्यांनी अशा प्रकारे राग व्यक्त करावा, हे बरोबर नाही असे म्हणत भास्कर जाधव यांचा राग काही क्षणापुरता होता आणि त्यांचा राग लवकरच निवळेल आणि ते सभागृहात परत येतील, असे संजय शिरसाठ यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 21, 2023 09:49 PM