म्हणून सावरकर गौरव यात्रेचं आयोजन, शिवसेनेच्या आमदारानं काँग्रेसला सुनावलं
VIDEO | राज्यातील वातावरण वेगवेगळ्या विषयांवरून तापलेलं असताना सावरकर गौरव यात्रेचं नियोजन का केलंय? शिवसेनेच्या आमदाराने काँग्रेसला दिले उत्तर
संभाजीनगर : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले आहे की, सावरकर गौरव यात्रा ही देशाचा स्वाभिमान असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर सावरकर ज्यांना कळालेले नाहीत यासह जे लोकं सावरकरांबद्दल द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करताय त्यांना पुन्हा सावरकर कळावे यासाठी हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. गौरवयात्रेच्या निमित्ताने आम्ही समाज प्रबोधन करत असल्याचेही संजय शिरसाट यांनी सांगितले आहे. आमदार संजय शिरसाट यांनी सावरकर यांच्याविषयी बोलतना ते म्हणाले की, सावरकर किती ग्रेट आहेत हे उद्धव ठाकरे यांनासुद्धा माहिती आहे. सावरकर यांनी जे जेलमध्ये आयुष्य जगले, त्यांनी केलेले कामं असतील हे सर्व सावरकर गौरव यात्रेच्या समारोपाच्या शेवटी दररोज दाखवण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सातत्याने सावरकरांचा गौरव करत होते असंही त्यांनी स्पष्ट सांगितले. या गोष्टीवर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची साथ सोडली पाहिजे फक्त राहुल गांधी यांना विरोध करूनही काही होणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.