विधानसभेच्या पायऱ्यांवरच शिंदे गटात येण्याची ठाकरेंच्या आमदाराला खुली ऑफर, व्हिडीओ व्हायरल
शिंदे गटाने ठाकरे गटाचे आमदार आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. आज विधानभवनात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यातील संवादाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुंबई, २० फेब्रुवारी २०२४ : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर असताना शिंदे गट आणि ठाकरे गट यांची जोरदार तयारी सुरू आहे. शिंदे गटाने ठाकरे गटाचे आमदार आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. आज विधानभवनात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यातील संवादाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट हे ठाकरे गटाचे आमदार वैभर नाईक यांना शिंदे गटात येण्याची खुली ऑफर देतांना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केलं. तुही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड कर, अशी फूस संजय शिरसाट यांनी दिली. तसेच तू आमच्याकडे आल्यावर आपण दोघेही मंत्रीपदाची शपथ घेऊ, असं अमिषही यावेळी त्यांनी दिलं. सध्या हाच मिश्कील व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
Published on: Feb 20, 2024 05:59 PM
Latest Videos