‘संजय राऊत पिसाळलेला कुत्रा अन् ते चावले म्हणून आम्ही चावणार नाही’, शिंदे गटाच्या आमदाराचा घणाघात
VIDEO | 'संजय राऊत हे पिसाळलेला कुत्रा आहेत. त्यांची लायकी नाही. ते चावले म्हणून आम्ही चावणार नाही', शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची महाविकास आघाडीसह ठाकरे गटावर सडकून टीका
छत्रपती संभाजीनगर, ७ ऑगस्ट २०२३ | माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचं नाव घेताच संजय राऊत हे थुंकल्याचे पाहायला मिळाले होते. यावर बोलत असताना संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर पुन्हा जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत हे पिसाळलेला कुत्रा आहेत. त्यांची लायकी नाही. ते चावले म्हणून आम्ही चावणार नाही, असाही घणाघात संजय शिरसाट यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये टीव्ही 9 मराठीशी बोलताना आमदार संजय शिरसाट यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावरही शिरसाट यांनी जहरी टीका केली आहे. तर विरोधक हे निर्ढावलेले लोक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं डायरेक्ट नाव घ्यायला यांची फाटते. त्यामुळे पडद्या आडून बोलत असतात. पण समोर येऊन बोलण्याची आणि शिंदे यांचं नाव घेण्याची ताकद कुणाच्यातही नाही, असं भाष्य करत संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीसह ठाकरे गटावर जहरी टीका केली आहे.