'त्या' व्हायरल अश्लील ऑडिओ क्लिपवर आमदार संतोष बांगर स्पष्टच बोलले...

‘त्या’ व्हायरल अश्लील ऑडिओ क्लिपवर आमदार संतोष बांगर स्पष्टच बोलले…

| Updated on: Mar 19, 2023 | 7:14 PM

VIDEO | आमदार संतोष बांगर यांनी 'त्या' व्हायरल ऑडिओ क्लिपवरून केला आरोप? नेमकं काय म्हणाले बघा

छत्रपती संभाजीनगर : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची शिवीगाळ करणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी काल संबंधित ऑडिओ क्लिप ट्विट केली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संतोष बांगर आणि अधिकारी एकमेकांवर अतिशय खालच्या भाषेत शिवीगाळ करत असल्याचं समोर आलं होतं. या व्हायरल ऑडिओ क्लिपवरून संतोष बांगर यांनी आज स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. संतोष बांगर म्हणाले, ती ऑडिओ क्लिप माझी नाही. हे कट कारस्थान सुरू आहे. बदनाम करण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्रात अनेक कलाकार आहेत. हा माझा आवाज कुणी तरी मिमिक्री केला आहे. मला बदनाम करण्याचं काम सुरू आहे. तुम लाख कोशिश कर लो, मुझे बदनाम करने की, में जब भी बिखरा हु, दुगनी रफ्तार से निखरा हु।, अशी शेरोशायरी संतोष बांगर यांनी केली आहे. मी काय करतो हे मतदार संघात जाऊन पाहा. मी काय काम केले आहे. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Published on: Mar 19, 2023 07:14 PM