उद्धव ठाकरे यांच्याकडे आता शिवसेना नाही, ग्रामपंचायत निकालावर बोलताना कुणाचा टोला?

उद्धव ठाकरे यांच्याकडे आता शिवसेना नाही, ग्रामपंचायत निकालावर बोलताना कुणाचा टोला?

| Updated on: Nov 06, 2023 | 4:01 PM

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात ठाकरे गट हा भाजप आणि महायुतीच्या मागे आहे. यावर आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना कायद्याने आणि जनतेच्या मनात राहिली नसल्याचे या ग्रामपंचायत निवडणुकीतून ते दिसून आले असल्याचेही शहाजी बापूंनी म्हटले.

सोलापूर, ६ नोव्हेंबर २०२३ | राज्यभरात एकूण २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी काल मतदान पार पडले. तर २ हजार ६८ ग्रामपंचायतींमधील २ हजार ९५० ग्रामपंचायत सदस्यांच्या जागेसाठी पोट निवडणुकसुद्धा घेण्यात आली. या सर्व ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहे. यामध्ये भाजप आणि महायुतीला चांगंल यश मिळताना दिसतंय तर उद्धव ठाकरे गट या ग्रामपंचायत निकालाच्या स्पर्धेत एकदम मागे असून सहाव्या क्रमाकावर ठाकरे गट आहे. यावर शिवसेनेचे नेते आणि आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या जवळ आता शिवसेना राहिलेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यभर काम करत आहे, असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Published on: Nov 06, 2023 04:01 PM