मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं रिमोट जनताच, शिवसेना खासदाराच इम्तियाज जलील यांना सडेतोड प्रत्युत्तर
VIDEO | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या 'त्या' खोचक टीकेवर शिवसेना खासदाराच रोखठोक प्रत्युत्तर, बघा व्हिडीओ
वाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाहुली आहेत आणि त्यांचा रिमोट अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे, असे विधान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं होतं. त्याला आता शिवसेनेच्या नेत्या खासदार भावना गवळी यांनी उत्तर दिले आहे. जे वक्तव्य संभाजीनगरचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलेलं त्यामध्ये कुठलाही तथ्य नाही. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे बाहुबली आहेतच कारण त्यांच्या मागे ५० आमदार आणि१४ खासदार गेले आहे म्हणून ते बाहुबली आहेत आणि महाराष्ट्राचा रिमोट कंट्रोल या आमदारांच्या आणि खासदारांच्या माध्यमातून त्यांच्या हातामध्ये आलेले आहे, असे त्या म्हणाल्या. कुठेतरी काही एखादे वक्तव्य करायचं आणि त्यामुळे वेगळं वातावरण निर्माण करायचं हे त्यांचे काम राहिले आहे. त्यांना काही फार गांभीर्याने घेण्यासाठी कारण आहे असं मला वाटत नाही, असे म्हणत भावना गवळी यांनी खोचक टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस आणि या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे हातात हात घालून या महाराष्ट्रात काम करत आहेत आणि ती नंबर वन जोडी आहे आणि म्हणून साहजिकच आहे ते काम चांगले करत आहेत. कोणाच्या तरी पोटामध्ये आज शुळ उठत आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.