'शिवसेनेचे ४० आमदार एकत्र आल्यानं भाजप पुन्हा सत्तेत', 'या' नेत्याच्या वक्तव्यानं चर्चा

‘शिवसेनेचे ४० आमदार एकत्र आल्यानं भाजप पुन्हा सत्तेत’, ‘या’ नेत्याच्या वक्तव्यानं चर्चा

| Updated on: Jun 13, 2023 | 2:28 PM

VIDEO | 'शिवसेनेच्या ४० आमदारांनी आपली ताकद ओळखावी', कुणी वाढवला आत्मविश्वास?

मुंबई : भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर दबावतंत्र वापरून कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे खासदार आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे समर्थक गजानन किर्तीकर यांनी सूचक व्यक्तव्य केले आहे. गजानन किर्तीकर म्हणाले, शिवेसनेचे ४० आमदार एकत्र आल्यामुळेचे आज भाजप पुन्हा एकदा सत्तेत आली. त्यामुळे आपली ताकद ओळखणं गरजेचं आहे. ४० आमदार सोबत होते म्हणूनच महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकली. मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार केले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. असे म्हणत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटातील आमदारांचा आत्मविश्वास वाढवला आहे.

Published on: Jun 13, 2023 02:26 PM