पंकजा मुंडे यांना ऑफर देणाऱ्या पक्षांना शिवसेना खासदार भडकला? थेट दिला इशारा; म्हणाला, 'वावड्या'

पंकजा मुंडे यांना ऑफर देणाऱ्या पक्षांना शिवसेना खासदार भडकला? थेट दिला इशारा; म्हणाला, ‘वावड्या’

| Updated on: Jun 06, 2023 | 12:00 PM

‘मी भाजपची आहे; पण भाजप माझा थोडीच आहे. काही नाही मिळाले तर मी जाईन ऊस तोडायला,’ अशा स्पष्ट शब्दांत आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर त्या भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी त्यांची भेट घेतली.

बुलढाणा : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पक्षात झालेल्या कोंडीवर आपली अस्वस्थता दिल्लीत बोलून दाखवली होती. त्यावेळी त्यांनी ‘मी भाजपची आहे; पण भाजप माझा थोडीच आहे. काही नाही मिळाले तर मी जाईन ऊस तोडायला,’ अशा स्पष्ट शब्दांत आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर त्या भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी त्यांची भेट घेतली. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचा प्रस्ताव आला तर त्यांना राष्ट्रवादीत सन्मान देऊ असे म्हटलं होतं. त्यापाठोपाठ काँग्रेसनेही त्यांच्यासाठी दारं उघडी होती. यानंतर विरोधकांनी त्यांच्या नाराजीवरून भाजपवर तोंड सुख घेतलं होतं. त्यावरून शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट विरोधकांना सुनावलं आहे. तसेच एखाद्याची बदनामी थांबवा असे त्यांनी म्हटंल आहे. तर याच्या आधीच पंकजा मुंडे यांनी, अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे त्यांचे नेते असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यमुळे त्यामुळे विरोधी पक्षाने वावड्या उठविणे बंद करावं असं सुनावलं आहे.

Published on: Jun 06, 2023 12:00 PM