राज ठाकरे यांना भाजपनं दिलेल्या ऑफरवर प्रतापराव जाधव म्हणतात...

राज ठाकरे यांना भाजपनं दिलेल्या ऑफरवर प्रतापराव जाधव म्हणतात…

| Updated on: Aug 14, 2023 | 11:39 PM

VIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आगामी काळात भाजपसोबत दिसणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. यावर शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले प्रतापराव जाधव

बुलढाणा, १४ ऑगस्ट २०२३ | भाजपने आपल्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. पण भाजपसोबत आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार असल्याने भाजपच्या ऑफरवर कोणताही निर्णय घेतला नाही, असं मोठं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी भाजपची ऑफर पूर्णपणे फेटाळल्याचं म्हटलेलं नाही. त्यामुळे राज ठाकरे हे आगामी काळात भाजपसोबत दिसणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. यावर शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. सगळेच पक्ष स्वतंत्र आहे, तर अजित पवार यांचा ही राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र आहे, पण अजून त्यांचे पक्क व्हायचंय. दरम्यान कोणाला कोणासोबत जायचे, हे त्या त्या पक्षाच्या नेतृत्वचा विषय आहे. जर कोणत्या पक्षाने त्यांना ऑफर दिली असेल तर ती ऑफर स्वीकारायची की नाही, हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना जे वाटलं असेल ते तसं बोलले असतील असं भाष्य शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी करत राज ठाकरे यांना भाजपने दिलेल्या ऑफरवर प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: Aug 14, 2023 11:37 PM