VIDEO : लोकशाहीचे चारही स्तंभ मोडीत काढण्याचा सरकारचा प्रयत्न
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. केंद्र सरकार लोकशाहीचे चारही स्तंभ मोडीत काढत आहे, असा हल्लोबल संजय राऊत यांनी केला.
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. केंद्र सरकार लोकशाहीचे चारही स्तंभ मोडीत काढत आहे, असा हल्लोबल संजय राऊत यांनी केला. यावेळी त्यांनी पेगाससच्या मुद्द्यावरून भाजपवर पुन्हा हल्ला चढवला. विरोधी पक्ष काय सांगतो, त्यांच्याकडे काय माहिती आहे, सरकारकडे काय माहिती आहे, यावर चर्चा झाली तर हा विषय किती गंभीर आहे हे समजेल. पण सरकार सर्वोच्च न्यायालयाचंही ऐकत नसेल तर हे सरकार या देशातील चारही प्रमुख स्तंभ मोडित काढायला निघालं आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
Latest Videos