मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना डिवचले, महाराष्ट्रात येताय तर…
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी ते कर्नाटकच्या दौऱ्यावर असणार आहेत. मोदी कर्नाटकवरून मुंबईत दाखल होणार आहेत. दरम्यान, या दौऱ्यापूर्वीच ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिवचले
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईच्या दौऱ्यावर असून मोदी मुंबईत विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहे. इतकेच नाही तर बीकेसीच्या मैदानावर मोदींची जाहीर सभा देखील होणार आहे. मुंबईत पंतप्रधान मोदींचा दौरा असल्याने राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून सभा स्थळाची विशेष पहाणी केली जात असून आढावा घेतला जात आहे.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी ते कर्नाटकच्या दौऱ्यावर असणार आहेत. मोदी कर्नाटकवरून मुंबईत दाखल होणार आहेत. दरम्यान, या दौऱ्यापूर्वीच ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिवचले आहेत. राऊत म्हणाले, कर्नाटकातून येत आहात तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सूचनाच देऊन या. मराठी बांधवांवर अत्याचार करू नका, असे सांगून या, असे आवाहन संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.
Published on: Jan 19, 2023 09:32 AM
Latest Videos