Sanjay Raut | ‘गोव्यात आमचा मविआचा प्रयत्न’, संजय राऊत यांचे मोठे विधान

| Updated on: Jan 08, 2022 | 7:17 PM

गोवा (Goa) आणि उत्तर प्रदेशमध्ये (Uattar Pradesh) शिवसेना काही जागा लढवणार असल्याची घोषणाच संजय राऊत यांनी केलीय. दरम्यान, अन्य राज्यांतही महाविकास आघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.

मुंबई : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा (5 State Assembly Election) कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर केलाय. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांत निवडणुका होत आहेत. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठी घोषणा केली आहे. गोवा (Goa) आणि उत्तर प्रदेशमध्ये (Uattar Pradesh) शिवसेना काही जागा लढवणार असल्याची घोषणाच संजय राऊत यांनी केलीय. दरम्यान, अन्य राज्यांतही महाविकास आघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.