Mumbai महापालिका निवडणूक समोर ठेवून धाडी टाकत असाल तर ते Boomerang होईल -Sanjay Raut

| Updated on: Mar 08, 2022 | 8:55 PM

मला वाटतं की महापालिका निवडणुका होत नाहीत तोवर प्रत्येक वार्ड, शाखेत रेड पडतील. त्यांना आता एकच काम उरलं आहे. जिथे जिथे शिवसेना तिथे रेड टाकण्याचं काम त्यांच्याकडे आहे’, असा टोला राऊत यांनी ईडी आणि आयटीला लगावलाय.

मुंबई : आज मुंबईत मोठी हालचाल आहे. धाडीवर धाडी पडत आहेत. त्यासाठी तुम्हालाही मोठं काम आहे. आम्ही विचार केला आम्हीही एक धाड टाकावी. आम्हालाही अधिकार आहे. मुंबईत घुसण्याचा घुसवण्याचा शिवसेनेलाही अधिकार आहे. आमच्या काही कार्यकर्त्यांवर ईडी नाही आता आयटीची रेड सुरु आहे. आयटीची भानामती चालू आहे. मला वाटतं की महापालिका निवडणुका होत नाहीत तोवर प्रत्येक वार्ड, शाखेत रेड पडतील. त्यांना आता एकच काम उरलं आहे. जिथे जिथे शिवसेना तिथे रेड टाकण्याचं काम त्यांच्याकडे आहे’, असा टोला राऊत यांनी ईडी आणि आयटीला लगावलाय.