‘मविआची कसली सभा, यांच्यात खुर्चीवरून भांडणं’, कुणी केला हल्लाबोल
VIDEO | नागपुरमधील महाविकास आघाडीच्या सभेवर शिवसेनेच्या नेत्याचा हल्लाबोल, केली जोरदार टीका, बघा काय म्हणाले
मुंबई : आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याने या पुरस्काराची उंची वाढणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचा कोणताही राजकीय संबंध नसल्याचा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते हा पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी देण्यात येणार असल्याने ते मुंबईत दाखल झाले आहेत. परंतु विरोधकांकडून यावर टीका होत असून ते नागपुरच्या मविआच्या सभेसाठी आल्याचेही सांगितले जात आहे. यावर नरेश म्हस्के म्हणाले, कसली महाविकास आघाडीची सभा, खुर्च्या कशा ठेवायच्या यावरून यांच्यात भांडणं सुरू आहेत. उद्धव ठाकरे एकीकडे म्हणतात आम्ही सावरकरांचा आपमान सहन नाही करणार तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांची मुलगी सावरकरांवर टीका करते, अजित पवार राष्ट्रवादीत नाराज आहेत, ते येणार की नाही, यावर संजय राऊत मुलाखत देताय, असे म्हणत त्यांनी मविआच्या सभेवर हल्लाबोल केलाय.