सचिन अहिर यांना शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी
राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडींना वेग आलेला असतानाच आता विधान परिषदेच्या उमेदवारांचीही चर्चा सुरु झालीय. शिवसेनेकडून दोन नावं निश्चित झाली असल्याचं समोर आलंय.
राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडींना वेग आलेला असतानाच आता विधान परिषदेच्या उमेदवारांचीही चर्चा सुरु झालीय. शिवसेनेकडून दोन नावं निश्चित झाली असल्याचं समोर आलंय. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. सध्या राज्याच्या राजकारणात निवडणुकीचे रंग चढू लागले आहे. राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. अश्यात आता विधान परिषदेसाठी दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. सध्या शिवसेना मोठ्या चेहऱ्यांपेक्षा कट्टर आणि स्थानिक नेत्यांना उमेदवारी देण्यावर भर देत असल्याचं दिसतंय.
Latest Videos