अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शिवसेनेत नवी खेळी, ठाकरे गटाच्या आमदारांना आणले अडचणीत

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शिवसेनेत नवी खेळी, ठाकरे गटाच्या आमदारांना आणले अडचणीत

| Updated on: Feb 26, 2023 | 10:26 PM

VIDEO | अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शिवसेना अॅक्शनमोडमध्ये, ठाकरे गटाच्या आमदारांना अडचणीत आणण्यासाठी आता कोणता डाव?

मुंबई : राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. अशातच आता शिवसेनेकडून ठाकरे गटातील आमदारांना घेरण्यासाठी नवी खेळी करण्यात आली आहे. शिवसेनेकडून ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आले आहे. शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून हे व्हीप जारी करण्यात आले असून व्हीप न पाळल्यास दोन आठवड्यात कारवाईचा विचार करु, असा इशारा भरत गोगावले यांनी दिला आहे. ज्यांनी व्हीप पाळला नाही त्यांच्यावर सध्या कारवाई करणार नाही, पण नंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे भरत गोगावले यांनी म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने आता दोन आठवड्याची वेळ दिलेली आहे. त्यामुळे एक आठवडा तर होत आलाय. आम्ही या सगळ्या उर्वरित ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावले आहे. त्यांनी अधिवेशनाला हजर राहावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: Feb 26, 2023 10:26 PM