शिंदेंचे 6 आमदार ठाकरेंकडे योणार? विधानसभा निवडणुकांपूर्वीच शिंदे गटात मोठा भूकंप होणार?

शिंदेंचे 6 आमदार ठाकरेंकडे योणार? विधानसभा निवडणुकांपूर्वीच शिंदे गटात मोठा भूकंप होणार?

| Updated on: Jun 07, 2024 | 2:18 PM

'शिंदे गटाचे हे सर्वच्या सर्व सहा आमदार उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या सहा आमदारांना प्रवेश दिल्यास शिंदे गटाचे इतर आमदारही ठाकरे गटात येऊ शकतात', ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांनी नेमकी काय दिली माहिती?

शिवसेना शिंदे गटाचे 6 आमदार शिवसेना ठाकरेंच्या संपर्कात आहेत, अशी माहिती ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांनी दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील नेमके कोणते सहा आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरवणार आहे. तर शिंदे गटाचे हे सर्वच्या सर्व सहा आमदार उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या सहा आमदारांना प्रवेश दिल्यास शिंदे गटाचे इतर आमदारही ठाकरे गटात येऊ शकतात, अशी माहिती आहे. ठाकरे गटाच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वीच राज्यात या मोठ्या घडामोडी होणार असल्याचंही या नेत्याने सांगितल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चिंता चांगलीच वाढली आहे. दरम्यान, शिंदे गट आणि अजितदादा गटाला लोकसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महायुतीत चांगलीच अस्वस्थता सुरू झाली असल्याचेही सांगितले जात आहे.

Published on: Jun 07, 2024 02:18 PM