इम्तियाज जलील निजामाची औलाद, शिवसेनेच्या 'या' नेत्यांचा घणाघात, बघा काय केली टीका

इम्तियाज जलील निजामाची औलाद, शिवसेनेच्या ‘या’ नेत्यांचा घणाघात, बघा काय केली टीका

| Updated on: Mar 05, 2023 | 5:12 PM

VIDEO | 'ओवैसी आणि जलील हे हैदराबादचे पार्सल', शिवसेनेच्या कोणत्या नेत्यानं साधला निशाणा

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील ही निजामाची औलाद आहे. असा घणाघात शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलाय. ओवैसी आणि जलील हे हैदराबादचे पार्सल आहे. म्हणूनच ते औरंगजेबाचा फोटो दाखवतात, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केली आहे. दरम्यान, सामाजिक एकता बिघडवणाऱ्या एमआयएमवर काय कारवाई करणार असा सवाल सूरज चव्हाण यांनी राज्य सरकारला केला आहे. एमआयएमनं आंदोलन केलं. तेव्हा त्यांनी औरंगजेबादचे फोटो दाखवलेत. ही निजामांची औलाद आहे. ओवैसी किंवा जलील हे सगळं हैदराबादचं पार्सल आहे. त्यामुळे त्यांना या शहरात त्यांचे वंशज ठेवायचे आहेत. म्हणून औरंगजेबाचा फोटो पहिल्यांदा या शहरात झळकला. साखळी उपोषण केलं. पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित होते. ती त्यांनी केली नाही. आम्ही या गोष्टीला सहन करणार नाही. संभाजीनगरची जनता सहन करणार नाही, असे म्हणत संजय शिरसाट यांनी इशारा दिला आहे.

Published on: Mar 05, 2023 05:12 PM